Fri, June 2, 2023

दुर्गाडी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव
दुर्गाडी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव
Published on : 20 February 2023, 12:27 pm
कल्याण, ता. २० (बातमीदार) : दुर्गाडी किल्ल्याच्या ऐतिहासिक आठवणी विद्यार्थ्यांना करून देत सम्राट अशोक विद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत दुर्गाडी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा केला. पोलिस उपनिरीक्षक अजिंक्य मोरे, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गोरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे, शिक्षक गणेश पाटील, माधुरी काळे, संगीता महाजन, उर्मिला साबळे, शोभा देशमुख, संतोष कदम, रामदास बोराडे, किरण राणे, विजया वामन, वैशाली शेगोकार, मनाली साबळे, चतुरा मडके, विद्या कांबळे व पालक उपस्थित होते.