चोवीस तास पाणी पुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोवीस तास पाणी पुरवठा बंद
चोवीस तास पाणी पुरवठा बंद

चोवीस तास पाणी पुरवठा बंद

sakal_logo
By

खारघर (बातमीदार) : खारघर, तळोजा, उलवे आणि द्रोणागिरी परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या सिडकोच्या हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सिडको प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी (ता. २२) सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुवारी (ता.२३) सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे; तर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.