Thur, March 23, 2023

घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात
घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात
Published on : 20 February 2023, 12:31 pm
अंबरनाथ (बातमीदार ) : रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून ७७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिवा येथील प्रकाश ऊर्फ अभय रमेश जाधव (वय १९) याला अटक करण्यात आली आहे. चिखलोली पाडा येथे घराच्या बाथरूमचा दरवाजा वाकवून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील २० हजार रुपये रोख आणि तीन मोबाईल घेऊन अज्ञात चोरट्याने पळ काढला होता. याबाबतची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश जाधव याला अटक केली. त्याच्याकडून २५ हजार रुपये रोख, दोन मोबाईल, दोन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याने केलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.