उल्हासनगरातील हत्येप्रकरणी दोघांना कोठडी

उल्हासनगरातील हत्येप्रकरणी दोघांना कोठडी

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : भांडण केल्याच्या रागातून खून केल्याच्या गुन्ह्याचा उलगडा १२ तासांत करण्यात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांच्या काल (ता. १९) मुसक्या आवळल्या असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील बालकनजी बारी शाळेच्या मोकळ्या मैदानात अशोक वाघमारे नावाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यासह उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलिस तपास करत होते. उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्या पथकाने रविवारी (ता. १९) रात्री पप्पू जाधव आणि अमित पांडे यांना अटक केली. त्यांनी चार दिवसांपूर्वी अशोक याच्यासोबत झालेल्या भांडणाच्या पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या केल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी दोघांना मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com