सहायक आयुक्त मारहाणीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक आयुक्त मारहाणीतील
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी
सहायक आयुक्त मारहाणीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी

सहायक आयुक्त मारहाणीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By

ठाणे, ता. २० (वार्ताहर) : महापालिकेच्या सहायक आयुक्तांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणप्रकरणी आज (ता. २०) ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. या चारही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

ठाणे पालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर १५ फेब्रुवारी रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता. अटक आरोपींना पहिल्यांदा एक दिवसाची आणि नंतर तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांची आज कोठडी संपणार असल्याने त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.