पृथ्वी शॉवरील हल्लाप्रकरणी आरोपी सपना गिलला जामीन मंजूर
मुंबई, ता. २० : क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात आरोपी सपना गिल हिला सोमवारी (ता. २०) अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ओशिवरा पोलिसांनी सपना गिलसह चार आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती; मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर सपनाच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यावरून सपनाला जामीन मंजूर झाला. सेल्फीच्या वादातून क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला केल्याप्रकरणी यू-ट्युबर सपना गिलसह चार आरोपींना ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.