
किन्हवलीत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
किन्हवली, ता. २१ (बातमीदार) : किन्हवलीच्या शहा चंदुलाल सरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ पार पडला. भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये, असा सल्ला शिक्षकांनी दिला. या वेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनाही भावना अनावर झाल्या होत्या.
किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शहा चंदुलाल सरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या २३७ विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे अध्यक्ष अरविंद भानुशाली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ‘भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये!’, असा सल्ला शिक्षकांनी दिला. विद्यार्थ्यांनाही शिक्षकांचे आभार मानताना अश्रू अनावर झाले होते.
या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष खंडू विशे, सचिव दत्तात्रेय करण, मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे, उपमुख्याध्यापक डी. एल. दिनकर, पर्यवेक्षक आर. जे. सावंत, वर्गशिक्षक बी. जे. सनांसे, डी. जे. फर्डे, डी.एम. वाघ, आर. एल. राठोड आदी उपस्थित होते. या वेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांची फुलपगार, पायल दिनकर यांनी केले.