बेकायदा फेरीवाल्यांचा ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा फेरीवाल्यांचा ठिय्या
बेकायदा फेरीवाल्यांचा ठिय्या

बेकायदा फेरीवाल्यांचा ठिय्या

sakal_logo
By

घणसोली, ता.२१ (बातमीदार)ः कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर बेघरांबरोबर आता फेरीवाल्यांनीही बस्तान बसवले आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले असून स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील या बेकायदा व्यवसायांकडे पोलिस तसेच पालिकेने दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
दाट लोकवस्ती असलेल्या कोपरखैरणे रेल्वे स्थानकातून दररोज हजारो संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या स्थानकांच्या परिसराला अतिशय गलिच्छ स्वरूप आले आहे. स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात बेघर नागरिकांचे वास्तव्य असते. त्यामुळे तिथेच राहणे, खाणे अशा प्रकारांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अशातच आता रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी देखील उच्छाद मांडला असून स्थानकाच्या प्रवेशद्वारावर भाज्या, फळे, बॅग्ज, बेल्ट्स, चपला, खेळणी तसेच भाजी-विक्रेत्यांनी ठाण मांडले असल्याने धावपळीच्या वेळेत अडथळ्यांची शर्यत पार करत प्रवास करण्याची वेळ आली आहे.
-------------------------------------------------
न्यायालयाच्या आदेशांचा यंत्रणांना विसर
रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी रेल्वेने विभागाने प्रत्येक रेल्वे स्थानकावर पोलिस तैनात केले आहे. असे असताना देखील घणसोली रेल्वे स्थानकावर फेरीवाल्यांनी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर कब्जा करून व्यवसाय थाटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परीक्षेत्रात फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आला आहे. असे असताना देखील रेल्वे पोलिसांकडून फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
---------------------------------
घणसोली रेल्वे स्टेशन बाहेर फेरीवाले बेकायदा व्यवसाय करतात. तसेच या परिसरात ये-जा करण्यासाठी प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याने यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा परिसरावर पूर्णपणे अतिक्रमण केले जाईल.
- योगेश शिंदे, प्रवासी