धामोळेतील समस्यांचे तहसीलदारांपुढे गाऱ्हाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामोळेतील समस्यांचे तहसीलदारांपुढे गाऱ्हाणे
धामोळेतील समस्यांचे तहसीलदारांपुढे गाऱ्हाणे

धामोळेतील समस्यांचे तहसीलदारांपुढे गाऱ्हाणे

sakal_logo
By

खारघर, ता. २१ (बातमीदार) : सिडकोने उभारलेल्या गोल्फ कोर्स आणि सेंट्रल पार्क परिसरात पाणी मुबलक असताना गोल्फ कोर्सला लागून असलेल्या धामोळे पाड्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे गोल्फ कोर्समध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या श्रीमंतासाठी चांगले रस्ते आहेत. मात्र, पाड्यातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने धामोळे पाड्यात विविध नागरी सुविधांची पाहणी करावी, अशी विनंती पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना करण्यात आली आहे.
खारघरमधील रस्त्यावर विद्युत रोषणाई केली जाते; मात्र पाड्यात विद्युत खांब असून पथदिवे नसल्याची अवस्था आहे. तसेच विकासाचे कोणतेही काम हाती घेतल्यास सिडको आणि वन विभागाकडून अडवले जात असल्यामुळे धामोळे पाड्यातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहेत. या गावातील विहिरीतील पाण्याने तळ गाठला असून महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंट्रल पार्कमधील पाणपोई गाठावी लागत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता सुरेखा दळवी आणि बाळाराम पारधी यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन विविध समस्यांचे कथन केले होते. या वेळी धामोळे पाड्याच्या एका बाजूला सिडको आणि दुसऱ्या बाजूला वन विभागाची जमीन आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाड्यात जाऊन पाहणी करणार असल्याचे तहसीलदार विजय तळेकर यांनी सांगितले.