Sat, June 3, 2023

सावित्रीबाई फुले वृतपत्र वाचनालयातर्फे शिवरायांना अभिवादन
सावित्रीबाई फुले वृतपत्र वाचनालयातर्फे शिवरायांना अभिवादन
Published on : 21 February 2023, 12:23 pm
ठाणे, ता. २१ (बातमीदार) : बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशनन ब्रह्मांड ठाणे व सावित्रीबाई फुले वृतपत्र वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रल्हाद वाघ, प्रा. सुनील भुसारा, प्रा. विनोद थोरात, प्रा. बालाजी घुगे, ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष राजेश जाधव, रवींद्र आसने तसेच मुलुंड येथील केळकर महाविद्यालयाचे विद्यार्थी नीरज आठवले, गगन कोचर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वेलफेअरचे सचिव प्रा. अनिल आठवले यांनी केले होते.