Sat, June 10, 2023

संत रोहिदास व शिवाजी महाराजांची संयुक्त जयंती
संत रोहिदास व शिवाजी महाराजांची संयुक्त जयंती
Published on : 21 February 2023, 12:23 pm
ठाणे, ता. २१ (बातमीदार) : चर्मकार विकास संघातर्फे संत रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. हा सोहळा महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्र मंडळ सभागृहात पार पडला. या वेळी स्थानिक नगरसेवक सुनील हंडोरे, चर्मकार विकास संघ प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश माने, महादेव शेगावकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी उपमहापौर पल्लवी कदम, निखिल बुडजडे, स्वानंद पवार, भूषण नखाते, मंगेश वाळंज, प्रमोद पवार, सुनील हंडोरे, विशाल वाघ, विनोद सांगेलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जाधव यांनी; तर नाथा भोईटे यांनी आभार मानले.