उमेश कोंडलेकर यांनी स्वीकारला पदभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेश कोंडलेकर यांनी स्वीकारला पदभार
उमेश कोंडलेकर यांनी स्वीकारला पदभार

उमेश कोंडलेकर यांनी स्वीकारला पदभार

sakal_logo
By

सरळगाव, ता. २१ (बातमीदार) : ठाणे-पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाजाच्या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष उमेश कोंडलेकर यांनी पदभार स्वीकारला. वैश्य समाजाच्या एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक जिल्हा स्त्री प्रतिनिधी, एक उपजिल्हा स्त्री प्रतिनिधी अशा पाच जागांसाठी दर दोन वर्षांनी निवडणूका घेतल्या जातात. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून समन्वय समितीचे प्रमुख नंदकिशोर मलबारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली होती. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्ष पदासाठी उमेश कोंडलेकर, उपाध्यक्षपदी किरण पेणकर व नितीन म्हात्रे, जिल्हा स्त्री प्रतिनिधीसाठी सानिया जगे, तर उपजिल्हा स्त्री प्रतिनिधीसाठी पुजा काबाडी यांची बिनविरोध निवड केली. कल्याण येथे नुकताच झालेल्या अधिवेशनात नवनिर्वाचित उमेदवारांना पदभार सुपूर्त करण्यात आला. या पाच पदांबरोबरच कैलास मनोरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.