साहिल तिवारीचा राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहिल तिवारीचा राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभाग
साहिल तिवारीचा राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभाग

साहिल तिवारीचा राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभाग

sakal_logo
By

विरार, ता. २१ (बातमीदार) : गुजरात येथील सरदार पटेल विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय राष्ट्रीय एकात्मता शिबिरात अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल तिवारी याने सहभाग घेतला आहे. त्याने गुजरातमध्ये राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. या शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीची व लोककलांची ओळख करून देण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची झलक प्रस्तुत करून साहिलने देशाच्या विविध भागांतून आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली. वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी साहिल तिवारी याचे अभिनंदन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. शत्रुघ्न फड व प्रा. आदिती यादव तसेच सांस्कृतिक विभागाच्या सदस्या प्रा. लतिका पाटील यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले.