राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौरी चौधरीची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौरी चौधरीची निवड
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौरी चौधरीची निवड

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गौरी चौधरीची निवड

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा (विठ्ठल नगर) येथील रहिवासी गौरी चौधरी या विद्यार्थिनीची ॲथेलेटिक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. गौरी चौधरी ही विद्यार्थिनी जिल्हा परिषद शाळा, वेहेलपाडा येथे इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकते. पालघर येथे झालेल्या जिल्हास्तरीय अथेलेटिक स्पर्धेत १०० मीटर, ५० मीटर आणि रिलेमध्ये विशेष यश संपादन केल्याने तिची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. माऊली स्पोर्ट्स क्लब आंबेघर या क्लबची ही विद्यार्थिनी असून सुरज हाडळ यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले. सत्कारप्रसंगी गौरीचे वडील मनोज चौधरी, विक्रमगड पोलिस ठाण्याच्या रोहिणी बोरसे व इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.