
डोंबिवलीत यंदा रौप्य महोत्सवी स्वागतयात्रा
डोंबिवली, ता. २१ (बातमीदार) : यंदा गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाला निघणाऱ्या स्वागतयात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. याबाबत गणपती संस्थानाची पहिली सभा नुकतीच पार पडली. विश्वस्त मंडळ आणि संयोजन समितीने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली असून, या सभेमध्ये प्रमुख संयोजक नेमण्यात आले आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षात ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना विचारात घेण्यात आली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक स्पर्धा ठेवण्यात येणार आहे. डोंबिवलीतून निघणारी ही पहिली स्वागतयात्रा आहे. डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानाच्या पुढाकाराने शहरातील सर्व सेवाभावी संस्थांना एकत्रित करणारी ही गणेश मंदिर ही संस्था आहे. श्री गणेश मंदिर संस्थान ८ मे रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करणार असल्याची माहिती संस्थेचे सदस्य प्रवीण दुधे यांनी दिली.