तळोज्यातून १२ लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोज्यातून १२ लाखांचा गुटखा जप्त
तळोज्यातून १२ लाखांचा गुटखा जप्त

तळोज्यातून १२ लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : तळोजातून घाटकोपरला टेम्पोतून नेल्या जात असलेल्या प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या कारवाईत १२ लाखांच्या गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता. १९) सकाळी नेहमीप्रमाणे महापे शिळफाटा मार्गावरील चेक पोस्ट येथे बॅरिकेट लावून नाकाबंदी सुरू केली होती. या वेळी संशयित वाहनांची तपासणी करत असताना सकाळी ७.३० च्या सुमारास शिळफाटा येथून महापेच्या दिशेने येणारा टेम्पो महापे चेकपोस्टवर आला असताना सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर व त्यांच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित ३० गोण्या भरून केसरयुक्त विमल पान मसाला व इतर गुटख्याचा साठा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी टेम्पो चालकाकडे अधिक चौकशी केली असता तळोजा येथील खोणी फाटा येथून हा माल घाटकोपर येथे पोहोचवण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता पोलिसांकडून हा गुटख्याचा साठा कुठून आणण्यात आला व तो कुणाला विक्री करण्यासाठी नेला जात होता, याचा तपास केला जात आहे.
---------------------------------------
पोलिसांनी टेम्पोमध्ये सापडलेला सुमारे १२ लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठ्यासह टेम्पो असा सुमारे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. तसेच या प्रकरणी टेम्पोचालकाविरोधात अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
-विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१