अंबादास दानवे यांची जव्हारला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबादास दानवे यांची जव्हारला भेट
अंबादास दानवे यांची जव्हारला भेट

अंबादास दानवे यांची जव्हारला भेट

sakal_logo
By

जव्हार, ता. २१ (बातमीदार) : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी सकाळी जव्हार तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी जव्हारच्या विश्रामगृहावर सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकाची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करून, तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्वसामन्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा पाढा वाचला.
जव्हार तालुक्यातील विविध विकासकामांच्या स्थगितीबाबत, आरोग्याचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगार युवकांना नगर परिषदेकडून लिलाव पद्धतीने दिल्या जाणाऱ्या गाळ्यांसाठी भरमसाठ डिपॉझिट व भाडे आकारणी, कशिवली या धोकादायक घाटातील तुटलेल्या संरक्षण भिंतीकडे महामार्ग विभागाचे होणारे दुर्लक्ष, अशा विविध समस्या तालुकाप्रमुख श्रावण खरपडे व विक्रमगड विधानसभा संघटक राजू अंभिरे आणि उपस्थित शिवसैनिकांनी दानवे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दानवे यांनी दिले.
दानवे यांनी विठू माऊली ट्रस्टच्या कुपोषित बालकांच्या बाल संजीवनी छावणीस भेट दिली. त्यानंतर जव्हारच्या पतंगशाह कुटीर रुग्णालयाला भेट दिली. यावेभर येथील आरोग्यवस्थेची माहिती त्यांनी घेतली. जव्हार येथील नियोजित २०० खटांच्या शासकीय रुग्णालयाच्या प्रकल्पास पूर्वाश्रमीच्या जव्हार संस्थांचे राजेसाहेब महेंद्रसिंग दिग्विजयसिंग मुकणे यांनी २५ एकर वैयक्तिक जमीन राज्य सरकारला दान केली आहे. मात्र ग्रामीण भागाच्या आरोग्य सुविधांच्या विकासाशी संबंधित असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्थानिक प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे रखडला असल्याची माहिती पत्रकारांनी दानवे यांना दिली. यावेळी याबाबत सविस्तर जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करुन पुढील कार्यवाही केली जाईल असे दानवे म्हणाले तसेच पत्रकारांनी जव्हार तालुक्यात होणारे स्थलांतर व रोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी करण्यात आली. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रावण खरपडे, विक्रमगड विधानसभा संघटक विजय अंभिरे, शहर प्रमुख परेश पटेल, साईनाथ नवले, शिवसेना तालुका संघटक चित्रांगण घोलप, डॉ. विठ्ठल सदगीर, महिला आघाडीच्या संगीता जाधव आदी उपस्थित होते.

‘आम्हाला धोका नाही’
शिंदे गटाचा व्हीप जारी झाल्यास काय होईल, या प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, शिंदे गटाचा व आमचा काही एक संबंध नाही. जे त्यांच्या सोबत नाहीत त्यांना व्हीप लावण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आम्हाला कोणताही धोका नाही, उत्तर दावने यांनी दिले.
...
विधान परिषद विरोधी पक्ष नेता जव्हारला येणार असल्याबाबत मला काही कल्पना देण्यात आली नाही. मी महविकास आघाडीचा एक भाग आहे. शिवाय सावर्डे येथे कुपोषणाने दोन बालकांचा मृत्यू झाला होता, या ठिकाणी भेट देणे गरजेचे होते.
- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड