सशक्त माता-सुदृढ बालक संगोपन प्रकल्प सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सशक्त माता-सुदृढ बालक संगोपन प्रकल्प सुरू
सशक्त माता-सुदृढ बालक संगोपन प्रकल्प सुरू

सशक्त माता-सुदृढ बालक संगोपन प्रकल्प सुरू

sakal_logo
By

विक्रमगड (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची वाढती समस्या लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ पालघर, बॉम्बे नॉर्थ वेस्ट मालाड आणि वरळी तर्फे ‘सशक्त माता-सुदृढ बालक’ हा कुपोषित माता व बाल संगोपन प्रकल्प विक्रमगड तालुक्यातील भोपोली येथे राबवला जात आहे. या प्रकल्पामध्ये येथील डॉ. एम. एल. ढवळे मेमोरिअल ट्रस्टच्या श्रीमती जानकी बच्चू दुबे होमिओपॅथिक ग्रामीण रुग्णालयाचे सहकार्य घेण्यात येत आहे. बाल कुपोषण थांबायला हवे असेल, तर सर्वप्रथम गर्भवती कुपोषित राहता कामा नयेत, गर्भवती जर सशक्त झाली, तर जन्माला येणारे बाळ हे निश्चितच सुदृढ असेल, याकरिता रोटरी क्लब तर्फे गरोदर मातांना कॅल्शिअम, लोहाच्या गोळ्या, प्रोटीन पावडरचे डबे आणि सुक्रोज इंजेक्शन यांचे वाटप करण्यात आले. यापुढे प्रसुतीपर्यंत त्यांना हे पुरवले जाणार आहे. या उपक्रमाचा २०० गरोदर माता व त्यांच्या बाळांना याचा फायदा होणार आहे. या कार्यक्रमास रोटरीचे जिल्हा समन्वयक भगवान पाटील, पालघर रोटरीचे अध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव संजय महाजन, प्रकल्प समन्वयक हनीफ धनानी आणि रफिक धडा, माजी अध्यक्ष किशोर महाडळकर, सुरेश केवट, संजय जिरापुरे आदी उपस्थित होते.