Thur, March 23, 2023

दिव्यांग विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ
दिव्यांग विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ
Published on : 21 February 2023, 10:18 am
डहाणू, ता. २१ (बातमीदार) : डहाणू गटातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून जिल्हा सेस निधीअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय गुणदर्शन स्पर्धा पार पडल्या. या गुणदर्शन स्पर्धेत चित्रकला, रांगोळी, गायन आणि नृत्यकला आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविलेल्या आणि इतर बक्षीस पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या समारंभाला पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला, गटविकास अधिकारी उच्च श्रेणी पल्लवी सस्ते, सहाय्यक गटविकास अधिकारी के. बी. अंजने, प्रियांका वडे, श्रद्धा पाटील, वंदेश सोनवणे, श्रीकांत कोसंबे आदी उपस्थित होते.