हत्येचा कट रचणारा आरोप अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्येचा कट रचणारा आरोप अटकेत
हत्येचा कट रचणारा आरोप अटकेत

हत्येचा कट रचणारा आरोप अटकेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ ः हत्येचा सूड घेण्यासाठी हत्या करण्याच्या कटातील एकाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी जळगावहून फरारी झाला होता. कल्याण स्थानकात मंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची झडती घेतली असता आरोपीच्या बॅगेत गावठी पिस्तूल आणि चार काडतुसे आढळली होती. त्याची चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. आरोपीचे नाव सुरेश असून त्याचा साथीदार मनोहर सुरळकर याला हत्या करण्यासाठी आलेला असतानाच अटक केली गेली होती. मनोहर सुरळकर याचा मुलगा धम्मप्रिय याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी या दोघांनी कट आखला होता; पण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा कट उधळला गेला.

मनोहरचा मुलगा धम्मप्रिय सुरळकर याने कथितरीत्या एका तरुणाची हत्या केली होती. त्या तरुणाच्या साथीदाराने २१ सप्टेंबर २०२२ रोजी नशिराबाद येथे धम्मप्रियची गोळ्या घालून हत्या केली. त्यावेळी मनोहर घटनास्थळावरच हजर होता. आपल्या मुलाच्या हत्येमुळे मनोहर सूडाच्या अग्नीने पेटून उठला. मुलाची हत्या करणाऱ्यांची हत्या करण्याचा कट त्याने साथीदार सुरेश याच्यासोबत आखला. या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या दिवशी जळगाव न्यायालयात हजर केले जाणार होते, त्या दिवशी मनोहर बुरखा परिधान करून न्यायालय परिसरातील मंदिराजवळ बसला. त्याला पाहून पोलिसांच्या एका खबऱ्याला त्याचा संशय आला. ही माहिती त्याने पोलिसांना दिली. तेव्हा शहर पोलिसांनी मनोहर याला तेथून अटक केली; पण सुरेश पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी सुरेशचा शोध सुरू केला होता. तो मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणार आहे, हे समजताच कल्याण पोलिसांनी गाडीत झडती घेतली. तेव्हा सुरेश शस्त्रासहीत सापडला.