
कचऱ्याचे ढीग हटवून सुशोभीकरण
विरार, ता. २१ (बातमीदार) : वसई-विरार महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून आता कचऱ्याचे ढीग हटवून त्या सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याला नागरिकांचाही चांगला पाठिंबा मिळू लागला आहे.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे कचरा टाकण्याची ठिकाणे तयार झाली होती. या कचऱ्यामुळे शहराच्या सुशोभीकरणाला गालबोट लागत होते. त्यामुळे पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी कचरा टाकण्याच्या जागा शोधून काढून त्या जागेवर सुशोभीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. वसई पश्चिमेकडील चुलना गावाच्या प्रवेशद्वारावर असलेली कचराकुंडी हटवून त्या ठिकाणी सुशोभीकरण केले आहे. आता त्या जागेला अनेक नागरिक भेट देत आहेत.
--------- ------------
पालिकेने या ठिकाणी सुशोभीकरण केले आहे. आता त्या ठिकाणी कचरा न टाकण्याची आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांनी उचलायला हवी.
- अनिलकुमार पवार, आयुक्त