Tue, March 28, 2023

पादचाऱ्याच्या चेहऱ्यावर फवारला विषारी स्प्रे
पादचाऱ्याच्या चेहऱ्यावर फवारला विषारी स्प्रे
Published on : 21 February 2023, 11:42 am
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : पायी चालणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीच्या चेहऱ्यावर कारमधून आलेल्या व्यक्तींनी विषारी स्प्रे मारल्याची घटना घडली. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात भरदुपारी ही घटना घडली असून सुशील मुननकर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशील यांची भाची रसिका बांदिवडेकर यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसिकाचे मामा सुशील हे मिरा-भाईंदर येथे नोकरीस आहेत. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास सुशील हे नेतिवली नाका परिसरातील ओमा रुग्णालयाजवळून पायी चालत घरी जात होते. या वेळी तेथे एक सफेद रंगाची कार आली. त्यातील अनोळखी व्यक्तीने सुशील यांच्या चेहऱ्यावर विषारी स्प्रेची फवारणी केली.