Sun, May 28, 2023

अपघातात चालक जखमी
अपघातात चालक जखमी
Published on : 21 February 2023, 3:20 am
मनोर, ता.२१ (बातमीदार) ः उड्डाणपुलाच्या कठड्याला टेम्पोची धडक लागल्याने टेम्पोचालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२१) घडली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मस्तान नाका उड्डाणपुलावर ही घटना घडली.
मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा टेम्पो गुजरातच्या दिशेने जात होता. नियंत्रण सुटल्याने टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकून सेवा रस्त्याच्या कडेला पथदिव्यांच्या ठिकाणी उलटला. त्यामुळे टेम्पोचालक जखमी झाला आहे.