युरियाच्या काळाबाजाराला विरोध ः दानवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युरियाच्या काळाबाजाराला विरोध ः दानवे
युरियाच्या काळाबाजाराला विरोध ः दानवे

युरियाच्या काळाबाजाराला विरोध ः दानवे

sakal_logo
By

पालघर, ता. २१ (बातमीदार) ः शेतकऱ्यांसाठी येणारा युरिया येथे उद्योजक वापरत असल्याचे ऐकायला मिळाले. यामध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच हा युरिया उद्योजकांपर्यंत पोहोचत आहे. हा युरिया शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. याच्या काळ्या बाजाराला अधिकारी वर्ग प्रोत्साहन देत असतील, तर त्याला मी विरोध करीन असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. याबाबत सरकारकडे माझी भूमिका मांडून युरियाच्या काळ्या बाजारला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करीन, असेही दानवे म्हणाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना हे वक्तव्य केले. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, विकास मोरे, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते जयेंद्र दुबळा, माजी जिल्हा परिषद सभापती नमिता राऊत, भूषण संखे, सुनील महेंद्रकर आदी उपस्थित होते.

आशियातील मोठी उद्योग नगरी म्हणून तारापूर उद्योगिक परिसर ओळखले जाते. परंतु, या भागातील स्थानिक तरुणांना एक टक्का रोजगार सुद्धा उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे. इथला आदिवासी गुजरात, वसई, विरार, पालघर मुंबईला रोजगारासाठी फिरत असतात. उद्योग विभाग कामगार विभागाबरोबर चर्चा केली असता असे स्पष्ट झाले की स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला नाही. ८० टक्के - २० टक्के या पद्धतीने शासनाने भुमिपुत्रांनांसाठी नोकरीचा नियम केला आहे. अधिकारी या संदर्भात बैठकीत बेफिकीर दिसले. आमच्याकडे तक्रार आली नाही म्हणून आम्ही बघितले नाही अशा प्रकारचे उत्तर त्यांनी बैठकीदरम्यान दिले असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बेरोजगारीचा आहे. प्रशासनातील अधिकारी या सगळ्या विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय. ते उद्योजकांचे बटीक बनलेत की काय अशा प्रकारची स्थिती पालघरमध्ये आहे, असेही दानवे म्हणाले. घिवली गावातील लोकांनी १९६० साली आपल्या जमिनी सरकारला दिल्या. मात्र अजून पर्यंत त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. ६५ वर्षे झाली असताना या गावाचा प्रश्न जसा होता तसाच आहे. एकीकडे उद्योग व्यवसाय या भागात येत असताना ६५ वर्षे या भागातील गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे असेही दानवे म्हणाले.