कोपरखैरणेत दोनदिवसीय कुस्ती स्पर्धा

कोपरखैरणेत दोनदिवसीय कुस्ती स्पर्धा

घणसोली, ता. २१ (बातमीदार) ः क्रीडापटूंना आपली अंगभूत गुणवत्ता सिद्ध करता यावी, तसेच त्यांना जिल्हा व राज्यातील उत्तम खेळाडूंचा खेळ अनुभवता यावा, या दृष्टीने नवी मुंबई महापालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने २५ व २६ फेब्रुवारी रोजी सेक्टर ७, कोपरखैरणे येथे डी मार्टच्या मागे पालिकेच्या शाळेच्या मैदानावर ‘नवी मुंबई महापालिका केसरी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता या स्पर्धेचा आरंभ होणार असून २६ फेब्रुवारीला रात्री ७.३० या पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.

या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर ७४ ते १०० किलो वजनी, ५५ ते ६५ किलो राज्यस्तरीय वजनी, राज्यस्तरीय ६५ ते ७३ किलो वजनी गट, ५५ ते ६० किलो कोकण विभागीय स्तर गट, ५५ ते ६५ किलो नवी मुंबई महापालिका क्षेत्र स्तर वजनी गट, ४० ते ५० किलो वजनी गटात नवी मुंबई महापालिका क्षेत्र, ५५ ते ६५ किलो महिला वजनी गट, ५० ते ५५ किलो वजनी गट सहभागी होणार आहेत. नवी मुंबईतील कुस्तीगिरांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होऊन आपल्या क्रीडा गुणांना उपलब्ध करून दिलेल्या हक्काच्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्यावा, तसेच कुस्तीप्रेमींनीही याप्रसंगी उपस्थित राहून राज्यातील नामांकित कुस्तीगिरांच्या खेळाचा थरार अनुभवावा, असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com