Fri, June 2, 2023

सुधीर हिरेमठ यांची सीबीआयमध्ये वर्णी
सुधीर हिरेमठ यांची सीबीआयमध्ये वर्णी
Published on : 21 February 2023, 3:16 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) नियुक्ती करण्यात आली आहे. सन २००७ च्या बॅचचे असलेले डीआयजी सुधीर हिरेमठ यांनी यापूर्वी पुणे आणि पिंपरी पोलिस आयुक्तालयात उपायुक्त; तर पदोन्नती मिळाल्यानंतर काही दिवस सोलापूर पोलिस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून सुद्धा ते कार्यरत राहिले आहे. सुधीर हिरेमठ हे आगामी पाच वर्षांसाठी सीबीआयमध्ये कर्तव्य बजावणार आहेत. त्याबाबतचे आदेश भारत सरकारच्यावतीने काढण्यात आला आहे.