पश्चिम रेल्वेच्या दोन उत्सव विशेष गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेच्या दोन उत्सव विशेष गाड्या
पश्चिम रेल्वेच्या दोन उत्सव विशेष गाड्या

पश्चिम रेल्वेच्या दोन उत्सव विशेष गाड्या

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : पश्चिम रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई सेंट्रल-भगत की कोठी आणि अहमदाबाद-पाटणा दरम्यान उत्सव गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांसाठी विशेष भाडे आकारले जाणार आहे. मुंबई सेंट्रल-भगत की कोठी साप्ताहिक विशेष दोन फेऱ्या मुंबई सेंट्रल येथून ४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे भगत की कोठी – मुंबई सेंट्रल स्पेशल भगत की कोठी ५ मार्च रोजी रात्री १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. अहमदाबाद-पाटणा साप्ताहिक विशेष अहमदाबादहून ६ मार्च रोजी सकाळी ९.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.०५ वाजता पाटणा येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे पाटणा-अहमदाबाद विशेष रेल्वे ७ मार्च रोजी पाटणा येथून २३.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता अहमदाबादला पोहोचेल.