Thur, June 1, 2023

एम.के.मढवी यांची तडीपारी रद्द
एम.के.मढवी यांची तडीपारी रद्द
Published on : 21 February 2023, 3:38 am
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : नवी मुंबईतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर उर्फ एम.के. मढवी यांच्यावर करण्यात आलेली तडीपारीची कारवाई उच्च न्यालयाने रद्द केली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून मढवी यांच्यावर सप्टेंंबर २०२२ मध्ये ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मढवी यांच्यावरील तडीपारीची कारवाई रद्द झाल्यानंतर राजकीय अकसापोटी सूड बुध्दीतून निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या शिंदे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने लगावलेली ही सणसणीत चपराक असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबईतील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमधून उमटत आहे.