
इंदेत रुग्णवाहिकेतील देवदुतांचा सन्मान
मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णाला मरणाच्या दारातून बाहेर काढणाऱ्या देवदुतांचा (रुग्णवाहिका चालक) गौरव करून अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. तालुक्यातील इंदे येथील अशोक शिंदे, आत्माराम शिंदे, प्रकाश शिंदे, रविंद्र शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
इंदे येथे दरवर्षी शिवरात्रीला वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यावर्षी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना कपडे वाटप, महिलांसाठी हळदी-कुंकू उपक्रम राबवण्यात आले. तसेच गावातील वयोवृद्ध नागरिकांचा व रुग्णवाहिका चालक यांचा सत्कार करण्यात आला. रुग्णवाहिका चालक तानाजी भोईर, महेंद्र हिंदुराव, शाम माळी, सुरेश घुडे, साईनाथ चौधरी, दीपक घोलप, भानुदास देसले, जितेंद्र झुझराव, नवनाथ विशे, हर्षद घोलप, जगदीश घोलप, डॉ. प्रतीक जाधव, संदीप पष्टे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गावातील रवींद्र लाटे, हरिभाऊ शिंदे, योगेश आलम, मारुती उबाळे, साईनाथ शिंदे, जयवंत सूर्यराव, शशिकांत पडवळ, सूरज सुरोशे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सूर्यराव यांनी केले.
--------------------
१७ देवदुतांचा सन्मान
इंदे येथील मयूर शिंदे, अमित शिंदे हे शिवरात्रीला वेगवेगळे उपक्रम राबवतात. त्यांनी १०८ व १०२ रुग्णवाहिकेच्या १७ रुग्णवाहिका चालक व रुग्ण मित्रांचा सत्कार केला. रुग्णांच्या सेवेशी निगडित घटक असूनसुद्धा त्यांच्याकडे समाज दुर्लक्ष करतो. रस्त्यातून असो वा घरातून दवाखान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम हा रुग्णवाहक करत असतो. कोरोना साथीच्यावेळी जग थांबल होते; परंतु हा देवदूत आपल्या कुटुंबाची व स्वतःच्या जीवाची परवा न करता रस्त्यावर धावत होता. रुग्णांचे नातेवाईक लांब उभे राहत होते; मात्र चालक स्वतः त्या रुग्णाला उचलून धीर देऊन दवाखान्यात दाखल करत होते.