Sun, May 28, 2023

जागतिक नेमबाजीत रुद्राक्ष पाटीलला सुवर्णपदक
जागतिक नेमबाजीत रुद्राक्ष पाटीलला सुवर्णपदक
Published on : 22 February 2023, 11:10 am
पालघर, ता. २२ (बातमीदार) : कैरो-ईजिप्त येथे झालेल्या जागतिक नेमबाजीच्या मिश्र गटात रुद्राक्ष पाटील व राजू नर्मदा या जोडीने सुवर्णपदक पटकावले. हंगेरीच्या ऑलिम्पिक कास्यपदक विजेत्या इस्तवान पेनी व डेनिस या जोडीचा १६/६ च्या मजबूत फरकाने पराभव करून भारतसाठी पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. रुद्राक्ष पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुलगा आहे. रुद्राक्ष व राजू यांच्या यशाबद्दल पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद पालघर व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, क्रीडाधिकारी प्रकाश वाघ, चेतन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.