चेंबूरमध्ये दूध केंद्राच्या जागेवर अतिक्रमण

चेंबूरमध्ये दूध केंद्राच्या जागेवर अतिक्रमण

मानखुर्द, ता. २३ (बातमीदार) ः चेंबूरच्या ठक्कर बाप्पा वसाहतीतील आरे केंद्राच्‍या जागेवर अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मोक्याची जागा बळकावण्यासाठी बनावट कागदपत्रेदेखील बनवले असल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे. याबाबत स्थानिकांनी रोष व्यक्त करत पालिका, पोलिस, आरे दूध विभाग, मुख्यमंत्र्यांसह थेट राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे.
चेंबूरची ठक्कर बाप्पा वसाहत ही पादत्राणे तयार करणारी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. या वसाहतीतील नागरिकांना शासकीय योजनेंतर्गत दूध उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मागील ४० वर्षांपासून आरे दुध केंद्र चालवण्यात येते. या केंद्राची जबाबदारी सुरेश कुलकर्णी यांच्यावर आहे. कोविड काळात लावण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर हे केंद्र बंद झाले. मुख्य रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या केंद्राच्या जागेची किंमत कोटींच्या घरात आहे. ती बळकावण्यासाठी परिसरातील काहींनी बनावट कागदपत्रे तयार करून त्या ठिकाणी कब्जा केला असल्‍याचे स्‍थानिकांनी सांगितले आहे.
केंद्राच्या भिंतीवर त्याने स्वतःच्या नावाचे फलक लावल्यानंतर स्थानिकांना ही बाब लक्षात आली. त्याविरोधात स्थानिकांनी संबंधित प्रशासन, मुख्यमंत्री तसेच राष्ट्रपतींकडे दाद मागितली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com