विक्रमगडमध्ये ४५ वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा

विक्रमगडमध्ये ४५ वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : शालेय जीवन, त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यावर करिअरला सुरुवात होते. वेगवेगळ्या क्षेत्रात हे विद्यार्थी नावलौकिक प्राप्त करतात. या गोष्टीचा शाळेला आणि शिक्षकांना सार्थ अभिमान असतो. शालेय जीवनातील हे सर्व सवंगडी आणि मित्र-मैत्रिणी एकत्र येतातच, असे नाही. दैनंदिन कामाचा व्याप त्याचबरोबर सर्वांचा संपर्क नसल्याने भेटीगाठी होत नाहीत; परंतु तालुक्यातील विक्रमगड हायस्कूलच्या १९७७-७८ या वर्षीच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन पार पडले. या निमित्ताने तब्बल ४५ वर्षानंतर पुन्हा दहावीचा वर्ग भरला.
स्नेहसंमेलनाला उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौवरवण्यात आले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हे हृदयस्पर्शी स्नेहसंमेलन पार पडले. या माध्यमातून सर्वांनी स्नेहभोजन करून एक वेगळा अनुभव घेतला. सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वर्ग मैत्रीण आपल्या सुमधुर आवाजात गीत गात उपस्थितांना जिंकून घेतले आणि पुन्हा एकदा शालेय आठवणींना एक प्रकारे संगीतमय उजाळा देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर भानुशाली, किशोर औसरकर, शरद पालवी,जयंत सांबरे, अशोक पाटील, विलास पाटील आणि इतर माजी विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या वेळी महिलांकरिता संगीत खुर्ची आणि हळदी-कुंकूचे आयोजन करण्यात आले होते.


---------------------------
अन् त्या आठवणी पुन्हा ताज्या
शालेय जीवन पुन्हा अनुभवण्यासाठी विक्रमगड हायस्कूलच्या १९७७-७८ च्या विद्याथ्यार्थ्यांनी व्हाट्सअप आणि फेसबुकद्वारे परस्परांशी संवाद साधू लागले. यातूनच गेट-टुगेदर करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार नुकतेच या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शिंपी पाडा येथील माझे गाव कृषि पर्यटन केंद्र येथे पार पडल. दैनंदिन कामे तसेच व्याप, उद्योग, व्यवसाय हे सर्व एक दिवस बाजूला ठेवून आपल्या शालेय जीवनातील आठवणी ताज्या करण्यासाठी त्यांना उजाळा देण्याच्या अनुषंगाने हे सर्वजण एकत्र जमले. पाहता पाहता पंचेचाळीस वर्षांपूर्वी चा दहावीचा वर्ग या ठिकाणी पुन्हा एकदा भरला. सर्व मित्र मैत्रिणी परस्परांना भेटुन एकमेकांची ओळख देत होते. प्रत्येक जण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com