सारथी सेंटर लुई ब्रेल पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारथी सेंटर लुई ब्रेल पुरस्काराने सन्मानित
सारथी सेंटर लुई ब्रेल पुरस्काराने सन्मानित

सारथी सेंटर लुई ब्रेल पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

ठाणे, ता. २२ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीच्या दृष्‍टिबाधित विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या सारथी सेंटरला लुई ब्रेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटीचे अध्यक्ष अमोल धर्मे, अंध विद्यार्थी सारथी सेंटरच्या को-ऑर्डिनेटर वृषाली वैद्य आणि सह को-ऑर्डिनेटर प्रिया कारंजे यांना हा पुरस्कार स्वागत थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्रातील दृष्‍टिबाधित विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट कार्य करणारे सेंटर म्हणून देण्यात आला. २२ जानेवारी रोजी लुई ब्रेल संस्था परतुर जालनाद्वारे हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्‍वीकारण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटीचे अध्यक्ष अमोल धर्मे, सारथी सेंटरच्या को-ऑर्डिनेटर वृषाली वैद्य आणि प्रिया करंजे उपस्थित होत्या. गतवर्षी म्हणजे २०२२ मध्ये दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या सारथी सेंटर, ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शाळा नं ९, चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व येथे चालविले जाते. यामध्‍ये गतवर्षी विविध उपक्रम राबविले गेले.