नगररचना विभागाला बीपीएमएस प्रणालीचे प्रशिक्षण

नगररचना विभागाला बीपीएमएस प्रणालीचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत आता बीपीएमएस या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे बांधकाम परवानग्या मिळणार आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार १ जुलै २०२२ पासून नवी मुंबई महापालिकेमार्फत सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने १२ ऑगस्ट २०२२ च्या पत्रान्वये बीपीएमएस संगणकप्रणाली व्यतिरिक्त सॉफ्ट टेक कंपनीने तयार केलेली ऑटो डीसीआर प्रणाली वापरण्यास मान्यता दिली आहे. नवी मुंबई महापालिकेतही ही कार्यप्रणाली नियमितपणे राबविली जावी यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून या प्रणालीद्वारे ऑनलाईन बांधकाम परवानगी प्राप्त करण्यामध्ये वापरकर्त्यांस येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. याबाबतच्या कार्यप्रणालीची माहिती व्हावी याकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नगररचना विभागामार्फत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिका मुख्यालयातील नगररचना विभागाच्या संमेलन कक्षात आयोजित या कार्यशाळेत साहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडत या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर व्हावा याकरिता नवी मुंबई महापालिका सर्व संबंधित प्राधिकरणांशी समन्वयाचे काम करीत असून या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर होऊन विकास प्रस्तावांची छाननी सुनियोजित पध्दतीने व सहज सुलभरित्या व्हावी असा प्रयत्न असल्याचे सांगितले. याप्रसंगी सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्या समवेत नगररचना विभागातील सर्व उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. सॉफ्टटेकच्या वतीने निखिल कापसे, अंकित पटाणी व सचिन सिनकर यांनी या प्रणालीची विस्तृत माहिती देत तिच्या वापराविषयी मार्गदर्शन केले. तसेच ऑटो डिसीआर संगणक प्रणालीमधील काही वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.

---------------------------
वास्तुविशारदांनाही प्रशिक्षण देणार
प्रीडीसीआर स्वतंत्र सॉफ्टवेअरमध्ये जे ऑटोकॅड वास्तुविशारद वापरतात त्या आवृत्तीशी सुसंगत असून ऑटो डिसीआर संगणक प्रणालीमध्ये सादर करण्यापूर्वी सदर नकाशे प्रमाणित करून घेण्यात येतात. प्रत्येक प्रकल्पाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करता येते, सदर संगणक प्रणाली वापरकर्त्यांना समजण्यास व वापरण्यास अत्यंत सोपी आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वास्तुविशारद व विकासक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नवी मुंबई महापालिका नेहमीच कटिबद्ध असते. लवकरच वास्तुविशारद यांनादेखील सॉफ्टटेकच्या वतीने प्रशिक्षण देण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
---------------------------
बीपीएमएस संगणक प्रणालीसह सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेली ऑटोडीसीआर प्रणाली देखील नवी मुंबई महानगरपालिकेत वापरण्यास सुरवात केलेली असून याचा उपयोग विकास प्रस्तावांची छाननी व पुढील कार्यवाही करण्यासाठी होईल व याचा उपयोग वास्तुविशारद व नागरिकांना मोठ्या प्रमाणात होईल.
सोमनाथ केकाण, साहायक संचालक नगररचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com