Tue, May 30, 2023

विलेपार्ल्यात कुणबी संमेलन
विलेपार्ल्यात कुणबी संमेलन
Published on : 22 February 2023, 1:01 am
मुंबई, ता. २२ : मुंबई प्रदेश कुणबी सेनेतर्फे कुणबी संमेलन व आरक्षण निर्धार परिषदेचे आयोजन रविवारी (ता. २६) सकाळी १० वाजता विलेपार्ले पूर्वेतील मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात करण्यात आले आहे. मुंबई शहरात ठाणे-पालघरसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, खान्देश येथील कुणबी समाज मोठ्या संख्येने राहत असून, या समाजात जनजागृती निर्माण करण्याचा उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे मुंबई अध्यक्ष प्रकाश बारे आणि सरचिटणीस चंद्रकांत कुळये यांनी केले आहे.