ठाण्यात हॉटेल्सला आग; तिघांना किरकोळ दुखापत

ठाण्यात हॉटेल्सला आग; तिघांना किरकोळ दुखापत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथे असलेल्या मे. श्री साई प्युअर व्हेज या तळ अधिक एक मजली हॉटेलला बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे हॉटेलमध्ये पाच कर्मचारी अडकले होते. यामध्ये हॉटेलच्या तळमजल्यावर अडकलेल्या दोघांनी बाहेर धाव घेत स्वत:ची सुटका करून घेतली; तर पहिल्या मजल्यावर दीपक दास, अमर देसाई आणि महेश मोकल हे तिघे अडकले. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पोलिस, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या तिघा कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान अग्निशमन दलाने हॉटेलमधून एकूण सात व्यावसायिक गॅस सिलिंडर व एक घरगुती सिलिंडर बाहेर काढत आग आटोक्यात आणली. जवळपास सव्वा तासाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com