संघटना पॅनलचा दणदणीत विजय

संघटना पॅनलचा दणदणीत विजय

पालघर, ता. २२ (बातमीदार) : पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या झालेल्या निवडणुकीत १५ जागापैकी संघटना पॅनेलने १२ जागांवर विजय मिळवला आहे. या पॅनेलने पतपेढी विकास व युवाशक्ती पॅनेलचा पराभव केला.
पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. या निवडणुकीत तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात होते. पालघर येथे पतपेढी भवनामध्ये बुधवारी मतमोजणी पार पडली. यात एकूण पंधरा जागांपैकी १२ जागा संघटना पॅनेलला तर तीन जागा पतपेढी विकास पॅनेलला मिळाल्या आहे. युवाशक्तीला एकही जागा जिंकता आली नाही. संघटना पॅनेलने पारदर्शक व्यवहार व सभासदांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. पतपेढीच्या सभासदांचा संघटनेवर विश्वास असल्यानेच त्यांनी पुन्हा निवडून दिल्याचे माजी अध्यक्ष पी. टी. पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
..
संघटना पॅनेलचे विजयी उमेदवार
पालघर विभाग : रवींद्र ठाकूर, रंजन दुमाडा, डहाणू विभाग : उल्हास सातवी, वसई विभाग : राजेंद्र ढगे, नामदेव पाटील, सचिन पाटील, विनोद मिश्रा आणि जिल्हास्तरीय विभाग : गणेश प्रधान, संतोष पावडे, सुचित्रा पाटील, शुभांगी पाध्ये, रखमा ढोणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com