पोलिस भरतीतील उमेदवाराचा मृत्यू

पोलिस भरतीतील उमेदवाराचा मृत्यू

मुंबई, ता. २२ : पोलिस भरतीसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागलेल्या तरुणाचा हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमर अशोक सोलके (२४) असे मृत तरूणाचे नाव असून तो अमरावती जिल्ह्यातील नवसारी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमर हा सध्या फोर्ट परिसरातील रेसिडन्सी हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. मंगळवारी (ता. २१) मैदानी चाचणी दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने परिचीत व्यक्तीला सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अमर हॉटेलमध्ये आंघोळ करत असताना त्याला उलटी झाली व तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. १७ फेब्रुवारीला मुंबई पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान कलिना येथील कोळे कल्याण मैदानात २७ वर्षीय गणेश उगले या उमेदवाराचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com