
श्री गणेश विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
दिवा : शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचालित, श्री गणेश विद्यामंदिर, दातिवली दिवा या शाळेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या परिसरातील महादेवाच्या मंदिरात महादेवाला अभिषेक घालण्यात आला. संध्याकाळी श्री गणेश विद्या मंदिर दातिवली प्राथमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष लीलावती म्हात्रे, संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे, शिवदत्त म्हात्रे, दिनेश म्हात्रे, केतकी म्हात्रे व गीता म्हात्रे हे पदाधिकारी तसेच मेस्टा संघटनेचे संस्थापक संजय तायडे-पाटील, महाराष्ट्र राज्याचे कोकण विभागीय मेस्टा संघटनेचे अध्यक्ष गजानन पाटील, ठाणे जिल्हा मेस्टा संघटनेचे अध्यक्ष नरेश पवार, पनवेलचे माजी नगरसेवक दिनकर म्हात्रे आणि रश्मी म्हात्रे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीराम चौधरी व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिल भोईर डोंबिवलीचे माजी नगरसेवक रवी पाटील या मान्यवरांनीही उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या हस्तकला उपक्रमात बनवलेल्या वस्तूंनी करण्यात आली. बालकलाकारांनी उत्तमरीत्या कलेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर गीताने झाला.