Wed, May 31, 2023

राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात वर्तक मेमोरियलचा सहभाग
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात वर्तक मेमोरियलचा सहभाग
Published on : 23 February 2023, 11:20 am
विरार, ता. २३ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना आकार देण्यासाठी सीबीएसईतर्फे प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था संचालित तारामाई वर्तक मेमोरियल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. हे प्रदर्शन प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये वर्तक मेमोरियल ॲकॅडमीच्या मुख्याध्यापिका रचना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यन बुगाले, कौशिक पाटील आणि विज्ञान शिक्षक मयूर वाला यांनी या कार्यक्रमात राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेत सहभागी झाले. दिल्ली येथे आयोजित प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ‘मेकिंग बायोप्लास्टिक’ या विषयावर प्रकल्प सादर केला.