तब्बल ४२ वर्षांनी पुन्हा भरली शाळा

तब्बल ४२ वर्षांनी पुन्हा भरली शाळा

पालघर, ता. २६ (बातमीदार) : लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी शाळेच्या १९८१ वर्षाच्या दहावीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शाळेच्या प्रवेशद्वारात १९८१ सालच्या शिक्षकांची आरती ओवाळून, फुले, अत्तर, गुलाबच्या पाकळ्या उधळत आणि लेझीम पथकाच्या वाद्याने करण्यात आली. या वेळी काही दिवंगत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वर्गमित्रांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. पुस्तक, शोभेच्या फुलाचे रोपटे, सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. रवींद्र वर्तक यांच्यामार्फत ५ वी ते १२ च्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या २०२१-२२ च्या विद्यार्थ्यांना स्टुडेंट ऑफ द इअर एलआयसीची ट्रॉफी आणि सन्मानपत्र देण्यात आले. तसेच नितीन शेष यांच्यामार्फत त्यांचे वडील दिवंगत वासुदेव शेष गुरुजी यांच्या स्मरणार्थ स्कॉलरशिप परीक्षेत प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप आणि आभार भरत पाटील यांनी मानले. लता पाटील आणि भरत पाटील यांनी सुमधुर आवाजात पसायदान गायले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्रद्धा पाटील आणि नितीन वर्तक यांनी केले.

------------------
शालेय जीवनाची आठवण
स्नेहसंमेलनाला उपस्थित सर्व शिक्षकांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी ४१ वर्षांचा प्रदीर्घ काळ काही क्षणात जवळ आणून ठेवला. आमचा केलेला सन्मान हा आम्हाला आनंद आणि समाधान देणारा ठरल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली. शिक्षिका आशा म्हात्रे, राजा म्हात्रे, ज. अ. वर्तक, चिंतामण ठाकूर, शिक्षिका इंदूबाई, मुख्याध्यापिका सुजाता म्हात्रे यांनी जुन्या आठवणी व गमतीजमती सांगून मनोगत व्यक्त केले. आपल्या शिक्षकांचे मनोगत ऐकताना माजी विद्यार्थ्यांना आपले शालेय जीवन आठवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com