मराठी भाषादिनानिमित्त ‘जागर मराठीचा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषादिनानिमित्त ‘जागर मराठीचा’
मराठी भाषादिनानिमित्त ‘जागर मराठीचा’

मराठी भाषादिनानिमित्त ‘जागर मराठीचा’

sakal_logo
By

विरार, ता. २३ (बातमीदार) : यंदा साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि वसईतील सामाजिक संस्था समाज मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी ‘जागर मराठीचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त वसईतील विद्यार्थी व भाषाप्रेमींसाठी समाज मंदिर, वसई येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात १४ व्या शतकापासून मराठी भाषेचे निरनिराळ्या कालखंडातील बदल घडविणारे संत, पंत, तंत (शाहीर) आणि वंत (विचारवंत) या वाङ्‍मय साहित्याचे नाट्यरूपी सादरीकरण होणार आहे. या नाट्याचे लेखन व संकलन कुणाल रेगे यांनी केले आहे. सूत्रधार म्हणून प्रसिद्ध निवेदिका धनश्री प्रधान-दामले या भूमिका वठवणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूल, जी. जी. कॉलेज वसई, विवा कॉलेज विरार इत्यादी शिक्षण संस्थांचे विद्यार्थी याचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी वसई बस डेपो ते समाज मंदिर या मार्गावर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या संबंधांतील सभा नुकतीच समाज मंदिर येथे ट्रस्टचे पदाधिकारी नितीन म्हात्रे, केवल वर्तक, संदेश वर्तक, पराग पाटील तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी अँड्रू कोलासो, अशोक मुळे, डॉ. सिलिलिया कर्व्हालो, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, जयंत देसले व सदस्य आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या दीपाली राऊत, प्रा. काळे व प्रा. डॉ. महादेव ईरकर यांच्या उपस्थितीत पार पडली.