कल्याणकरांची घुसमट

कल्याणकरांची घुसमट

कल्याण, ता. २६ (बातमीदार) : सरकारी यंत्रणेच्‍या ढिसाळ नियोजनामुळे कल्याण पूर्व भागामध्ये फेरीवाल्‍यांचा विळखा आणि अरुंद रस्‍त्‍यावर वाहने पार्क होऊ लागल्याने, कल्याण पश्चिमप्रमाणे पूर्व भागामध्येही नागरिकांची घुसमट होऊ लागली आहे. गेली अनेक वर्षे कोंडीतून सुटका होत नसल्‍याने कल्याण पूर्व भागामधील नागरिकांना मोकळा श्वास कधी मिळणार, असा प्रश्‍‍न आता सर्वसामान्‍यांकडून उपस्‍थित होत आहे.

कल्याण पूर्व भागामध्ये दिवसागणिक लोकवस्ती आणि लोकसंख्या वाढत असताना तेथील राहणाऱ्या नागरिकानां मूलभूत गरजा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शहरातून स्टेशन गाठण्यासाठी कल्याण पूर्वमधील चक्की नाका ते श्रीराम टॉकीज रस्‍त्‍याचे रुंदीकरण करून चांगला मोठा रस्ता बनविण्यात आला. त्यानंतर गणपती चौक ते काटेमानिवली व्हाया तिसगाव नाका ते सिद्धार्थ नगर असा यु टाइप रस्ता रुंदीकरण करण्यात आला. मात्र, सध्या तो ही अपुरा पडत आहे. अनेक ठिकाणी पदपथावर फेरीवाले, भाजी विक्रेता, दुकानदारांच्‍या अतिक्रमणामुळे कल्याण पूर्वमधून रेल्वे स्थानक गाठणे जिकिरीचे झाले आहे. जागोजागी रस्त्यावर वाहने उभे राहत असल्याने कल्याण पश्चिमप्रमाणे कल्याण पूर्वमध्ये ही बकालपणा आला आहे.
----------------------
नागरिकांना मनस्‍ताप
लोकवस्तीप्रमाणे दुचाकी वाहनांची संख्याही वाढल्याने अनेक जण घरापासून रेल्वेस्थानक दुचाकीने प्रवास करतात. कल्याण पूर्व भागामधील बोगद्याजवळ वाहन पार्किंगला जागा नसल्याने अनेक जण रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर वाहने पार्किंग करू लागल्याने सकाळी आणि संध्याकाळी स्टेशन ते घर पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला .
----------------------------
जेथे जावे तेथे फेरीवाले
जुने गणपती मंदिर पालिकेने जमीनदोस्त केल्याने तो परिसर आणि दादासाहेब क्रीडांगणाच्या समोरच्या पट्यात बेकायदेशीर फेरीवाले बसत असल्याने संध्याकाळच्या वेळी नागरिकांना रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहेत. परिसरात रिक्षा स्टँड आणि दुचाकी पार्किंगमुळे त्रास होत आहे. दुसरीकडे म्हसोबा चौक ते जुनी जनता सहकारी बँक रस्ता पर्यायी वाहतूक होऊ शकते; मात्र, तेथे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहन चालकांना अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे.
--------------------------
कोट
कल्याण पूर्वमधील नागरिक सर्व प्रकारचे कर भरतात. मात्र, त्यांना काय सुविधा मिळते हा प्रश्‍‍न असून सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे कल्याण पश्चिमेप्रमाणे कल्याण पूर्व ही बकाल होत आहे.
-प्रथमेश सावंत, अध्यक्ष, जाणीव सामाजिक संस्था
----------------------------------------
शहरातील बहुतांश परिसरात अरुंद रस्ते असून, गणपती चौक परिसर आणि सिद्धार्थ नगर परिसरात वाहन पार्किंगबाबत जनजागृती करू. त्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्‍यात येणार आहे.
-रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण पूर्व वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com