बांबू हस्तकला प्रशिक्षणाला महिलांचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबू हस्तकला प्रशिक्षणाला महिलांचा प्रतिसाद
बांबू हस्तकला प्रशिक्षणाला महिलांचा प्रतिसाद

बांबू हस्तकला प्रशिक्षणाला महिलांचा प्रतिसाद

sakal_logo
By

विरार, ता. २३ (बातमीदार) : सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. यात गरजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त व्हावा यासाठी ‘सेवा विवेक’ने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार महिलांना मोफत बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा १७ वा वर्ग दुर्वेश-देसकपाडा या गावात सुरू आहे. या प्रशिक्षण वर्गाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.
सेवा विवेकचा हा प्रशिक्षण वर्ग ३० दिवस चालणार असून यात ४० आदिवासी महिलांनी सहभाग घेतला आहेत. पालघर तालुक्यातील दुर्वेश - देसकपाडा येथील प्रशिक्षण वर्गाला सेवा विवेक संस्थेतील प्रशिक्षित महिलाच हे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणात बांबूपासून, राखी, पेन होल्डर, मोबाईल होल्डर, फिंगर जॉइंट ट्रे, कंदील, बांबू ट्रॉफी आदी सारख्या ४० हुन अधिक आकर्षक वस्तू तयार करणे शिकवण्यात येणार आहे.