खासदार गोपाळ शेट्टी यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार गोपाळ शेट्टी यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर
खासदार गोपाळ शेट्टी यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर

खासदार गोपाळ शेट्टी यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

कांदिवली, ता. २३ (बातमीदार) ः उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना ‘संसदरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. लोकसभेत प्रभावी कामगिरी करताना त्यांनी अत्यंत महत्त्‍वपूर्ण प्रश्न आणि विधेयके मांडून त्यावर अभ्यासपूर्ण भाषणे केली. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, शाळेत भगवद गीतांचे पाठ सुरू करणे, मुलींची लग्नाचे वय वाढवणे अशा अनेक संवेदनशील मुद्दावर त्यांनी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठविला आहे. त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याची बातमी पसरताच कांदिवलीत कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जल्‍लोष केला. तसेच नागरिकांकडूनही त्‍यांच्‍यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या सह-अध्यक्षपदाखालील प्रख्यात संसदपटू आणि नागरी समाजाच्या ज्युरी समितीने नामनिर्देशित केले आहे. ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी लोकसभेतील आठ आणि राज्यसभेतील पाच खासदार, याशिवाय दोन विभागीय संबंधित स्थायी समित्या आणि एका दिग्गज आणि प्रतिष्ठित नेत्यालाही विशेष पुरस्कार श्रेणीअंतर्गत नामांकन देण्यात आले आहे.
लोकसभा ज्युरी समितीने महाराष्ट्रातून उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना यंदाचा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. २५ मार्चला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचे दिल्लीत वितरण होणार आहे.