दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करावी
दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करावी

दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करावी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : बीड जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात आली. या वेळी प्रमाणपत्रावरील अपंग टक्केवारी व प्रत्यक्ष अपंगत्वाचे प्रमाण यामध्ये तफावत आढळून आली. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेतील दिव्यांग आरक्षणातून सेवेत आलेल्या व जिल्हा बदलीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे विशेष कॅम्प आयोजित करून वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करून घ्यावी. तसेच तपासणीअंती आढळणाऱ्या बोगस दिव्यांगांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली.
बीड जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात आली. या वेळी प्रमाणपत्रावर नमूद अपंग टवकेवारी व प्रत्यक्षात आढळलेले अपंगत्वाचे प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आल्याने ७८ शिक्षकांना बीड जिल्हा प्रशासनाने निलंबित केले आहे. अशातच बनावट प्रमाणपत्रांची व्याप्ती ही बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर असण्याची शक्यता आहे. दिव्यांगांना समाजामध्ये सन्मानाने जगता यावे म्हणून शासन नोकरीत आरक्षण, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत सोयी-सवलती देत आहे. याचा लाभ उठवण्यासाठी काही मंडळी बनावट प्रमाणपत्राचा आधार घेत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहत आहेत, हा खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत असल्याचे मत आमदार दौलत दरोडा यांनी व्यक्त केले.