वंदे भारत ट्रेनला पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंदे भारत ट्रेनला पसंती
वंदे भारत ट्रेनला पसंती

वंदे भारत ट्रेनला पसंती

sakal_logo
By

‘वंदे भारत’ला पसंती
ठाणे स्थानकातून प्रतिदिन ३०० जणांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : आरामदायी आणि आनंददायी रेल्वे प्रवासाच्या अनुभवासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा समावेश झाला आहे. या दोन्ही रेल्वे मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या मार्गावर धावणार आहे. त्यात मुंबई ते शिर्डी या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेला ठाणे स्थाकात थांबा दिला आहे. अशातच प्रवाशांनीदेखील ‘वंदे भारत’ ट्रेनला पसंती दर्शवली आहे. त्यानुसार मागील पंधरा दिवसांत ठाणे स्थानकातून प्रतिदिन सुमारे ३०० ते ३२५ प्रवाशांनी नाशिक आणि शिर्डी प्रवासाचा लाभ घेतला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी दिली. तसेच ‘वंदे भारत’ ट्रेनचा शुभारंभ झाल्यानंतर १२ फेब्रुवारीला सर्वाधिक ठाणे स्थानकातून ३७५ प्रवाशांनी प्रवास केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन वाहतुकीला चालना मिळण्यास मदत होणर आहे. भारतीय रेल्वेसाठी, विशेषकरून मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक संपर्क व्यवस्थेसाठी या रेल्वेचा फायदा होणार आहे. मुंबई ते शिर्डी या ‘वंदे भारत’ ट्रेनमुळे नाशिक आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांवर जाणाऱ्या भाविकांचा प्रवास गतिमान होणार आहे. या ट्रेनला १६ डबे असणार आहेत. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास प्रवाशांना थेट क्रूशी संवाद साधता येणार आहे. वाय-फायची सुविधादेखील प्रवाशांठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ही रेल्वे मुंबईवरून सुटल्यानंतर दादर, ठाणे, नाशिक रोड आणि शिर्डी या स्थानकांवरच थांबणार आहे. त्यामुळे ठाणे ते शिर्डी या प्रवासादरम्यान केवळ एकच थांबा असल्यामुळे ठाण्याहून शिर्डीला अवघ्या चार ते साडेचार तासांत पोहचणार आहे. त्यामुळे भाविकांना एक दिवसाची ट्रीप करणे देखील शक्य होणार आहे.

१० फेब्रुवारी रोजी मुंबई-शिर्डी ‘वंदे भारत’ ट्रेनचा शुभारंभ झाला. ठाण्यात मागील पंधरा दिवसांत ही रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरली असल्याचे दिसून येत आहे. ठाणे स्थानकातून नाशिक आणि शिर्डीला जाण्यासाठी प्रतिदिन ३०० ते ३२५ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी दिली. त्यानुसार मागील आठ दिवसांत दोन हजार ते दोन हजार ४०० प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे जैन यांनी या वेळी सांगितले.

.........................
मुंबई-साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये
• ही देशातील दहावी ‘वंदे भारत’ रेल्वे
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि साईनगर शिर्डीदरम्यान जलद कनेक्टिव्हिटी
• आर्थिक राजधानीला महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांशी जसे की नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डीला जोडले जाणार
• थळ घाट म्हणजे कसारा घाट विभागात बँकर इंजिनशिवाय ३७ मीटरला १ मीटर घाट चढणारी पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन