ठाण्यात शनिवारी पेट फेस्टिव्हल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात शनिवारी पेट फेस्टिव्हल
ठाण्यात शनिवारी पेट फेस्टिव्हल

ठाण्यात शनिवारी पेट फेस्टिव्हल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरात ‘ पेट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून रंगणाऱ्या या दोनदिवसीय फेस्टिव्हलचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये पाळीव प्राण्यांच्या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराबरोबरच श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा व फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, ट्विन वॉक, फॅशन वॉक असे आगळे-वेगळे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांबरोबरच ठाणेकरांना पाळीव पाण्यांच्या विविध दुर्मिळ प्रजाती पहाव्यास मिळणार आहेत.
पाळीव प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘डॉग्ज वर्ल्ड इंडिया’ या संस्थेच्यावतीने यंदाही ‘पेट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. घोडबंदर येथील खेवरा सर्कल भागातील डिमार्टलगत असलेल्या गार्डन इस्टेटजवळील मैदानात २५ ते २६ फेब्रुवारी रोजी हा फेस्टिव्हल होणार आहे. पाळीव प्राण्यांचे विनामूल्य तपासणी आरोग्य शिबिर, श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा, श्वानांची चपळता, चलाखी आणि आज्ञाधारकता यावर आधारित कार्यक्रम, फॅशन वॉक, एक्झॉटिक ब्रीड शो, खेवरा सर्कल ते कार्यक्रम स्थळापर्यंत पेट रन, ट्विन वॉक, ब्रीड फेस्टिव्हल, असे कार्यक्रम दोन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये होणार आहेत.