कामगाराच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पाणी मारत असताना बाराव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उलवा नोडमध्ये घडली होती. मृत कामगाराला आवश्यक कोणतीही साधने दिली नसल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे न्हावा-शेवा पोलिसांनी विकसक आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला.

घनशाम गुमान राणा (वय २३) हा मूळचा ओरिसातील असून तो उलवे सेक्टर ९ मध्ये ‘त्रिवेणी हाईट्स’ या बांधकाम साईटवर राहत होता. २६ जानेवारी रोजी सकाळी तो इमारतीच्या बाराव्या मजल्यावर पाणी मारण्याचे काम करत होता. या वेळी त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. न्हावा-शेवा पोलिसांच्या प्राथमिक तपासात इमारतीच्या सभोवताली व आतील बाजूस सुरक्षेच्या अनुषंगाने संरक्षक जाळी न बसवल्याचे आढळून आले. तसेच त्याला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधनसामग्री न पुरविता त्याला पाणी मारण्यास पाठवल्याचे समोर आले. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक कैलास नारायण घरत, कंत्राटदार धनाजी संपत काटकर व सब कंत्राटदार शशिकांत भिकुभाई भदानी या तिघांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com