लोकअदालतीत महावितरण फायद्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकअदालतीत महावितरण फायद्यात
लोकअदालतीत महावितरण फायद्यात

लोकअदालतीत महावितरण फायद्यात

sakal_logo
By

मुलुंड, ता. २३ (बातमीदार) ः प्रशासन व जनता यांच्‍यातील वाद मिटवण्यात लोकअदालतीचा मोठा वाटा आहे. विशेष करून यामध्‍ये प्रशासनाची रखडलेली प्रकरणे निकाली लागत असून याचा फायदा जनता, तसेच विविध प्रशासकीय मंडळांना होत असल्‍याचे दिसून येते. असाच फायदा महावितरणच्‍या मुलुंड परिमंडळाला झाला आहे. या परिमंडळातील ६८९ प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली आहेत, अशी माहिती मुलुंड महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांनी दिली.
मुलुंड भागात महावितरणने वीजबिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. यामध्ये काही प्रकरणे वीजचोरीचीही होती. ६८९ प्रकरणांतील ग्राहकांना लोकअदालतीच्या माध्यमातून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये काही प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे दत्तात्रय भणगे यांनी सांगितले.
याबद्दल अधिक माहिती देताना भणगे म्हणाले, ही प्रकरणे तडजोडीद्वारे निकालात काढण्यात आली आहेत. महावितरणच्या मुलुंड परिमंडळात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या आणि वीजचोरीची दाखल आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. या अनुषंगाने ३९ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. मुलुंड विभागामध्ये ३९ ग्राहकांनी ५ लाख ४२ हजार ९१५ रुपयांचा भरणा केला आहे व आणखी काही ग्राहक काही दिवसांत भरणा करणार आहेत. प्रकरणे निकाली लावण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण, तसेच महावितरण मुलुंडचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे व विधी अधिकारी सोनोने यांनी विशेष परिश्रम घेतले. महावितरणने सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांची थकबाकी तत्काळ भरावी व पुढील कायदेशीर कारवाई टाळावी. पुढील महिन्यात पुन्हा एकदा लोकअदालत असेल, त्यामध्‍येही ग्राहकांना एक संधी उपलब्ध असेल, असेही महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे.

मुलुंड परिमंडळातील स्थिती
६८९ एकूण प्रकरणे
००० वीजचोरीची प्रकरणे
३९ प्रकरणांमध्ये तडजोड
६५० प्रकरणे बाकी
५ लाख ४२ हजार ९१५ रुपयांचा भरणा

महावितरणचे आवाहन
ग्राहकांनी त्यांची थकबाकी तत्काळ भरावी व पुढील कायदेशीर कारवाई टाळावी. पुढील महिन्यात पुन्हा एकदा लोकअदालत आहे. त्यामध्‍येही ग्राहकांना संधी उपलब्ध आहे.

मुलुंड भागात महावितरणने वीजबिल थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. यामध्ये काही प्रकरणे वीजचोरीची होती. ६८९ प्रकरणांतील ग्राहकांना लोकअदालतीच्या माध्यमातून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये काही प्रकरणे निकाली काढण्यात आली.
- दत्तात्रय भणगे, कार्यकारी अभियंता, मुलुंड